नाशिक : लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा | पुढारी

नाशिक : लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
धुळवड येथील रामोशीवाडीमध्ये कृषी विभाग व लोकसहभागातून नाले, ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह अडवून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी विभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी अशोक अल्हट, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंके, ग्रा. पं. सदस्य रावसाहेब गोफणे, कचरू गोफणे, गोरख गोफणे, गोकुळ गोफणे, शरद गोफणे, भाऊसाहेब गोफणे, मच्छिंद्र चव्हाण, जालिंदर चव्हाण, कृषी सहायक प्रदीप भोर आदी उपस्थित होते. रामोशीवाडीमध्ये जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बर्‍याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह लोकसहभागातून पारंपरिक पद्धतीने अडविण्यात आला. पाण्याचा साठा करून उपलब्ध साधनांचा जसे सिमेंट, खतांची रिकामी पोती, माती, वाळू इ. वापर करून वनराई बंधारा बांधण्यात आला.

वनराई बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता. गुरांना पाणी पिण्याकरिता, ग्रामस्थांना धुणी धुण्याकरिता होणार आहे. वनराई बंधार्‍याच्या आजूबाजूला असलेल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी मदत होत आहे. – संजय सूर्यवंशी, विभागीय कृषी अधिकारी.

हेही वाचा:

Back to top button