राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित | पुढारी

राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता विरोधकही त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

काय म्हणाले खडसे?

खडसे म्हणाले, आत्तापर्यंत रात्रीतून सरकार बदलले आहे. काही सरकार खोक्यांमुळे बदलले. राज्यात काहीही होऊ शकते. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज होतील. काही सरकार खोक्यांमुळे तर काही असेच बदलले. खडसे म्हणाले, एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात फार मोजक्याच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले बाकीच्यांना मिळणार नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास इतर आमदारांतील अस्वस्थता वाढेल, ती बाहेरही येईल.

हेही वाचा

कराड: उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर पलटी; चालक गंभीर

गायरानातील अतिक्रमणे नियमित करा: आमदार सुमन पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मोदी सरकारचे यश : योगा शिक्षक, शेफ्सही जातील ऑस्ट्रेलियाला; मुक्त व्यापार करारावर मोहर 

 

Back to top button