कराड: उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर पलटी; चालक गंभीर | पुढारी

कराड: उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर पलटी; चालक गंभीर

कराड; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गाच्या मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत कराडकडून कोल्हापूर दिशेला निघालेल्या ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटी झाल्या. सोमवार (दि.२१) रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालक नाल्यात पडून जखमी झाला. मशिनने तोडलेला ऊस नाल्यात पसरल्यामुळे वाहनासह उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे या उपमार्गावरील वाहतूक सहा तास विस्कळीत झाली होती.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, कराडकडून ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून कारखान्याकडे निघाला होता. महामार्गावर सोमवारी रात्री दहा वाजता मलकापूर येथील भारत मोटर्स समोर आला असता अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ऊस भरलेल्या दोन्हीही  ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर उपमार्गावर पलटी झाला.

यावेळी उपमार्गावरील वाहतूक सहा तास विस्कळीत झाली होती. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र रोटावेटर मशीनने तोडलेला ऊस नाल्यासह रस्त्यावर विस्कटल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दोन्ही ट्रॉलीसह ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नाल्यात पडलेल्या चालकास उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

अपघाताची नोंद दुपारपर्यंत पोलिसात झाली नव्हती. मात्र चालकाचा रक्तदाब कमी झाल्याने हा आपघात झाला आसावा, अशी घटनास्थळी चर्चा होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी व महामार्ग पोलिस कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून वाहन बाजूला करून उपमार्ग वाहतुकीस सुरू केला.

हेही वाचा  

राजगुरूनगर बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल तांबे पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय भेगडे बिनविरोध

मोदी सरकारचे यश : योगा शिक्षक, शेफ्सही जातील ऑस्ट्रेलियाला; मुक्त व्यापार करारावर मोहर

कोल्हापूर : कार- दुचाकीच्या धडकेत पिशवी येथील तरुण ठार, एक गंभीर जखमी

Back to top button