Nashik ZP : झेडपीत 2,500 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा | पुढारी

Nashik ZP : झेडपीत 2,500 जागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने मंगळवारी (दि.15) घेतलेल्या शासन निर्णयाने पदभरती ही जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयानुसार 31 मेपर्यंत रिक्त जागांबाबत आढावा, जाहिरात, परीक्षा आणि निकाल घोषित करून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात याव्यात, असे म्हटले आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रमच जाहीर करण्यात आलेला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये 2, 538 जागा या वर्ग 3 च्या आहेत. या जागांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

याबाबत 31 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयदेखील पारीत करण्यात आला होता. त्यानंतर या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button