नाशिक: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी आज निवडणूक | पुढारी

नाशिक: जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जि. प. कर्मचारी पतसंस्थेच्या 15 जागांच्या कार्यकारिणीसाठी रविवारी (दि. 6) निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. मराठा हायस्कूलच्या प्रांगणात होत असलेल्या या निवडणुकीच्या मतदानासाठी 1,467 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सकाळी 8 ते 4 या वेळेत हे मतदान होत आहे. त्यासाठी 4 मतदान केंद्रे, 32 कर्मचार्‍यांची नेमणूक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 5 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच या मतदानाचे पूर्णवेळ व्हिडिओ शूटिंग होणार आहे. 4 ला मतदान संपल्यानंतर 5 पासून मराठा हायस्कूलच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीमध्ये 4 फेर्‍या होणार आहेत आणि रात्री 9 पर्यंत निकाल लागणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, गत दोन पंचवार्षिक बिनविरोध झाल्यानंतर हीदेखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. अगदी माघारीच्या दिवशीही अखेरच्या क्षणापर्यंत निवडणूक न होता, खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध व्हावी, यासाठी आजी – माजी सभासद प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश आले नसल्याने निवडणूक जाहीर झाली. गेल्या पूर्ण आठवडाभर निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकलेले आपला आणि सहकार पॅनल यांनी जोरदार प्रचार करत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

हेही वाचा:

Back to top button