Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास | पुढारी

Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास

नाशिक, निफाड : येथील वकील ॲड. ललित कुलकर्णी हे आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीच्या सुटीनिमित्त परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री घर फोडत सोन्याच्या दागिन्यांसह पा‌वणेपाच लाखांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे. ॲड. कुलकर्णी यांचे घर चोरट्यांनी 2 नोव्हेंबरला मध्यरात्री कडीकोयंडा तोडला आणि कपाटामध्ये ठेवलेले सुमारे पावणेपाच लाखांचे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यामध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button