पाथर्डी : उमेदवारांमुळे झाली शिक्षक बँकेची निवडणूक आदर्श : बापूसाहेब तांबे | पुढारी

पाथर्डी : उमेदवारांमुळे झाली शिक्षक बँकेची निवडणूक आदर्श : बापूसाहेब तांबे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सध्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी सर्वच पॅनेलने सांभाळली. त्यामुळे समाजाला बँकेची निवडणूक केव्हा झाली, हे समजलेच नाही. सर्वच पॅनेलमधील उमेदवारांनी या निवडणुकीत मतदारांना अर्थिक प्रलोभन दाखविले नाही. त्यामुळे निवडणूक आदर्शवत झाल्याचे प्रतिपादन गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी केले. जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीत गुरुमाऊली मंडळाच्या विजयी सभेचा समारोप, नूतन संचालक व विश्वस्त मंडळाच्या पदग्रहण सोहळा पाथर्डी शाखेत झाला.त्यावेळी तांबे बोलत होते.

अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे होते.माजी चेअरमन साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, सुयोग पवार, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत बांगर, शरद वांढेकर, राजेंद्र निमसे, संतोष आंबेकर, बाबाजी डुकरे, मच्छिंद्र लोखंडे, अनिल टकले, सुवर्णा राठोड, शिक्षक बँकेचे नूतन संचालक कल्याण लवांडे, ज्ञानेश्वर शिरसाट, बाळसाहेब तापकीर, विठ्ठल फुंदे, विजय नरवडे, भाऊसाहेब ढाकणे, रमेश दहिफळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तांबे म्हणाले, शिक्षकांची बँक ही फक्त शिक्षकांची आणि शिक्षक सभासदांचीच आहे. विकास मंडळाच्या नियोजित मल्टिस्पॅसिलिटी हॉस्पिटल बाबतचे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातील सर्व विरोधी मंडळांच्या नेते मंडळींना विश्वासात घेऊनच घेतले जातील, हा विश्वास तांबे यांनी या ठिकाणी सभासदांना दिला .

राजकुमार साळवे म्हणाले, इतर मंडळांनी प्रचारादरम्यान केलेल्या आरोपांचे गुरुमाऊलीच्या शिलेदारांनी परखडपणे खंडण करून सत्यस्थिती सभासदांसमोर मांडण्याचे काम केले. त्यामुळे हा विजय झाला. आपण दिलेला जाहीरनामा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करावयाचा आहे. यापुढील पाच वर्षात होणारा कारभार अतिशय सूक्ष्म पारदर्शी आणि सभासद हिताचा होईल. बाळासाहेब कदम म्हणाले, ऐक्य मंडळ व अ. भा. प्राथमिक शिक्षक संघाने गुरुमाऊली मंडळाशी केलेली युती ही संचालकांनी केलेला आदर्श कारभार बापूसाहेब तांबे यांनी जुन्या पायंड्यांना दिलेला छेद आणि सर्वसामान्यांना दिलेली संधी, या सर्व बाबींचा विचार करून आम्ही तांबे यांच्या नेतृत्वात गुरुमाऊली मंडळासोबत या निवडणुकीत उतरलो होतो.

रामदास दहिफळे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा बापूसाहेब तांबे यांनी केली. कार्यक्रमासाठी संदीप काळे, भास्कर दराडे, सचिन शिंदे,अतुल आंधळे, महेश फुंदे, भीमराव चाचर, संजय चव्हाण, मिनिनाथ देवकर, दीपक महाले, बंकट बडे, सुनील शिंदे, नवनाथ आंधळे, हिरामन गुंड, संतोष बोरुडे महेश लोखंडे, अशोक दहिफळे, मंजुषा वराडे, पुष्पा फुंदे, वैशाली पारखे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अर्जुन शिरसाठ यांनी, तर भीमराव चाचर यांनी आभार मानले.

Back to top button