नाशिक : बनावट प्रमाणपत्राद्वारे वृक्षतोड करत 32 हजारांची फसवणूक | पुढारी

नाशिक : बनावट प्रमाणपत्राद्वारे वृक्षतोड करत 32 हजारांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वृक्षतोडसंदर्भात महापालिकेचे बनावट प्रमाणपत्र व पावती तयार करून त्यामार्फत एकाकडून 32 हजार रुपये घेत विनापरवानगी वृक्षतोड केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.कीर्तिकुमार पारसमल लोंढे (49, रा. द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन काशीनाथ धाकतोडे (43, रा. नांदूरगाव) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

संशयित सचिनने 18 नोव्हेंबर 2021 ते 20 मे 2022 या कालावधीत रासबिहारी लिंकरोडवरील नारायणनगर परिसरात वृक्षतोड केली. संशयिताने लोंढे यांच्या मालकीच्या जागेवरील कडुलिंबाचे वृक्ष तोडले. यासाठी सचिनने विभागीय अधिकारी तथा नवीन नाशिक विभाग वृक्ष अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे वृक्ष तोडण्याबाबत बनावट प्रमाणपत्र व रोखपाल यांच्या स्वाक्षरीची पावती तयार करून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून लोंढे यांना दिली. त्यानुसार सचिनने लोंढे यांच्याकडून 32 हजार रुपये घेतले त्याचप्रमाणे विनापरवानगी कडुलिंबाचे वृक्ष तोडून फसवणूक केली.

हेही वाचा :

Back to top button