युरोपवर अणुहल्ल्याचे ढग … रशियाकडून सीमेवर 11 अणुबॉम्बवाहू विमाने

युरोपवर अणुहल्ल्याचे ढग …  रशियाकडून सीमेवर 11 अणुबॉम्बवाहू विमाने
Published on
Updated on

लंडन;  वृत्तसंस्था :  फिनलँडसह नॉर्वेला लागून असलेल्या सीमेवर रशियाने 11 बॉम्बर विमाने सज्ज ठेवल्याची उपग्रहीय छायाचित्रे समोर आल्याने जगभर खळबळ उडाली आहे. ब्रिटनमधील 'द मिरर' या वृत्तपत्राने 'सॅटेलाईट इमेज'सह पुतीन आणि त्यांचे लष्करी अधिकारी युरोपातील देशांवर अण्वस्त्र हल्ल्यांच्या तयारीत असल्याचे
वृत्त छापले आहे.

अमेरिकेसह युरोपातील बहुतांश देशांनी रशिया अणुहल्ल्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. नाटोच्या फौजा रशियावर चाल करून येतील तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा रशियन  राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी परवाच दिला होता. त्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'पुतीन यांचा इशारा हा नुसताच इशारा नाही. तो सहज म्हणून घेण्याची चूक जगाने करू नये', अशी प्रतिक्रिया नोंदविली
होती. बायडेन यांच्या प्रतिक्रियेतील गांभीर्य या उपग्रहीय छायाचित्रांनी अधोरेखित केले आहे.

द मिरर'च्या वृत्तानुसार, रशियाच्या ओलेनाया हवाई तळावर 12 टीयू-160 ही 11 विमाने तैनात आहेत. शिवाय कोला हवाई तळावर '4 टीयू-95 एस' विमाने सज्ज आहेत. नॉर्वेतील 'फॅक्टिस्क. नो' या संकेतस्थळानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्रायलमधील 'जेरुसलेम पोस्ट' या दैनिकानेही ओलेनाया हवाई तळावर अणुयुद्धसद़ृश
हालचाली सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित केेले होते. इस्रायलच्या 'इमेज सेट' या गुप्तचर यंत्रणेनेही त्याला दुजोरा दिला होता.  एरवी रशियाची बॉम्बर विमाने मॉस्कोपासून 450 कि.मी.वरील 'अँजेल' हवाई तळावर तैनात असतात. ती आता येथून हलवण्यात येऊन फिनलँड आणि नॉर्वेच्या सीमेवर आणली आहेत. बॉम्बर विमानांतून पारंपरिक शस्त्रे आहेत की अणुबॉम्ब, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

रशियाच्या कॅम्पवर गोळीबार; 11 ठार

रशियाच्या लष्करी शिबिरावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 11 जण मरण पावले, तर 15 जण गंभीर जखमी झाले.
युक्रेनविरुद्धच्या युद्धात सहभागासाठी रशियन नागरिकांकरिता गन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असताना ही घटना घडली. हा हल्ला दहशतवादी हल्ला होता, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. चकमकीत दोन हल्लेखोरांनाही सुरक्षादलांनी ठार केले. युक्रेनजवळील रशियाच्या लष्करी छावणीत ही घटना घडल्याने पुतीन यांना तो मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

ब्रिटनही तयारीत

चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये दोन रशियन लढाऊ विमाने स्कॉटिश हवाई हद्दीत शिरली होती. ब्रिटनच्या रॉयल हवाई दलाने या विमानांना घेरले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांत तणाव वाढला होता. युक्रेनसह रशियातील एकूणच हवाई क्षेत्रावर ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news