शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव | पुढारी

शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

येथील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु झाले आहेत.  सद्यस्थितीत नविन लाल कांद्याची आवक देखील सुरु झाली आहे. तर चांदवड बाजार समितीत नविन लाल कांदा विक्रीस आल्याने बाजार समिती व व्यापारी वर्गातर्फे कांदा विक्रेता शेतकरी बापू बाबुराव आहिरे खडकी (मालेगाव) यांचा सत्कार करुन नविन लाल कांद्याच्या खरेदीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी लाल कांद्याच्या प्रतनुसार रुपये १४२५ प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच उन्हाळ कांद्यास कमीत कमी १००० व जास्तीत जास्त २१२१ व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. यावेळी शेतकरी, कांदा व्यापारी बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे व्यापारी प्रवीण हेडा, मोहन अग्रवाल, पारस डुंगरवाल, भूषण पलोड, कैलास कोतवाल, संदीप राऊत, पप्पू हेडा, आदित्य फलके, आदीसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button