नाशिक : ऑडिटिंगच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांचे मौन का ? : ॲड. नितीन ठाकरे | पुढारी

नाशिक : ऑडिटिंगच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांचे मौन का ? : ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शतकोतर वाटचाल करत असताना संस्‍थेचे कामकाज पारदर्शी असल्‍याचा दावा सरचिटणीसांकडून केला जातो. मात्र, संस्‍थेच्‍या लेखापरीक्षणाबाबत का बोलले जात नाही? सभासदांपासून ऑडिट रिपोर्ट दडविला जात आहे. जिल्‍ह्‍यात मराठा समाजाचे ऑडिटर असताना इतर व जिल्‍ह्‍याबाहेरील ऑडिटर नेमण्याचे काय कारण? असा सवाल पॅनलचे नेते ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

मंगळवारी (दि.२३) परिवर्तन पॅनलचा बागलाण तालुक्यात झंझावती दौरा पार पडला. यावेळी ते बोलत होते. संस्‍थेचे ऑडिटर म्‍हणून काम करत असलेल्‍या मराठा समाजाच्‍या ऑडिटरला अयोग्य वागणूक देऊन अधिकृत ऑडिटरला अनेक महिने ऑडिट करण्यासंदर्भात पत्र दिले जात नव्‍हते. नगरच्‍या दुसऱ्या ऑडिटर संस्‍थेला काम दिले असताना, त्‍यांना काम जमले नाही. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पुन्‍हा आधीच्‍या ऑडिटर यांना नेमणुकीचे पत्र देण्यात आल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले. विद्यमान सभापती हे केवळ संस्थेची गाडी, ड्रायव्हर वापरतात पण आजपर्यंत एकही सभासदाला त्यांना न्याय देता आला नसल्याचा दावा बाळासाहेब क्षीरसागर यांनी केला. तर शिरीष राजे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांना स्पर्श केले. प्रचार मेळाव्यापूर्वी ग्रामस्थांकडून मोठी छत्री देत सन्मान स्वागत करण्यात आले. सटाणा तालुक्यातील कंधाणे, वीरगाव, करंजाड, द्याने, नामपूर, लखमापूर येथे मेळावे पार पडले. यावेळी कडू चव्हाण, बाळासाहेब बिरारी, महादू बिरारी, रमेश पवार, भिला देवरे, माधव दिघावकर, रामदास देवरे, लक्ष्मण निकम, उद्धव देवरे, नामदेव कापडणीस, गौरव कापडणीस, भीमराव कापडणीस, मधुकर कापडणीस, भीमराव सावंत, बाळासाहेब सावंत, पंडित भामरे, अनिल बच्छाव, अशोक पाटील, अशोक बच्छाव उपस्थित होते.

कसमादे उच्चशिक्षित : ॲड. कोकाटे

सटाणा तालुक्यात परिवर्तन पॅनलचा झंझावात आहे. या तालुक्यातील सभासद हे नाशिकपासून दिल्लीपर्यंत मोठ्या पदांवर उद्योग व नोकरीत आहेत. सजगतेबाबत कासमादे पट्टा उच्चशिक्षित आहे. संस्थेसाठी परिवर्तन घडवून आणा, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button