पिंपरी : बसचालकासह दोघांना लुटणार्‍यास अटक | पुढारी

पिंपरी : बसचालकासह दोघांना लुटणार्‍यास अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  बसचालकासह वाहकाला शिवीगाळ, दमदाटी करीत लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 22) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अ‍ॅटलास कॉपको बस स्टॉप, कासारवाडी येथे घडली. ओंकार सुरेश चव्हाण (वय 20), कुणाल नरेंद्र कालेकर (26, रा. फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी हेमंत भाऊराव पेठे (38, रा. देहूगाव) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी मध्यरात्री पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. त्यांची बस कासारवाडी येथील अ‍ॅटलास कॉपको बस स्टॉपवर थांबली. त्यावेळी तिघेजण बसमध्ये चढले. त्यांनी फिर्यादी आणि बस चालकाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच फिर्यादीकडील तीन हजार 355 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले.  घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिस आणि खंडणी विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खंडणी विरोधी पथकाने सोमवारी ओंकार आणि कुणाल या दोघांना अटक केली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button