नाशिक : पगार न दिल्याने कर्मचार्‍याने केली जाळपोळ, दुकानातील मशिनरी, कागदपत्रे सगळच पेटवलं | पुढारी

नाशिक : पगार न दिल्याने कर्मचार्‍याने केली जाळपोळ, दुकानातील मशिनरी, कागदपत्रे सगळच पेटवलं

नाशिक : पगार न दिल्याने एका कर्मचार्‍याने दुकानातील मशिनरी, कूशन व कागदपत्रांची जाळपोळ केल्याची घटना बेळगाव ढगा शिवारात घडली. या प्रकरणी सागर राजेंद्र वैष्णव (38, रा. तपोवन रोड) यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात संशयित बलदेव रामबहादूर बनवासी (30, रा. बेळगाव ढगा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर यांच्या फिर्यादीनुसार संशयित बलदेवने दि. 19 ते 20 ऑगस्टदरम्यान जाळपोळ केली. सागर यांचा फॅबि—केशनचा व्यवसाय असून, बलदेवने त्यांच्याकडे पगाराची मागणी केली होती. मात्र, पगार न मिळाल्याने बलदेवने सागर यांच्या दुकानातील मशिनरी, कूशन व कागदपत्रांना आग लावली. या आगीत 74 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button