पिंपरी : शहरातील मतदारांचे आधारकार्ड जोडणीस सुरुवात | पुढारी

पिंपरी : शहरातील मतदारांचे आधारकार्ड जोडणीस सुरुवात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांचे मतदार यादीतील नाव आधारकार्डची जोडणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. ती नोंदणी ऑनलाइनद्वारेही करता येते. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आधारकार्ड जोडणी ऐच्छीक आहे. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांचा मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येत आहे.

मतदारांचे आधार कार्ड जोडणीही केली जात आहे. त्यासाठी अर्ज ‘सहा अ’ भरून मतदार आधारकार्डची जोडणी करू शकतात. व्होटर हेल्पलाइन अ‍ॅपवर ऑनलाइनही ही जोडणी केली जाऊ शकते. तसेच, दुबार नावे वगळण्यात येणार आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर 9 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या मतदार यादीत आपले नाव तपासून पाहावे, असे आवाहन पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी (हेगडेवार भवन, आकुर्डी, प्राधिकरण), चिंचवड (यशवंतराव चव्हाण शाळा, थेरगाव) आणि भोसरी (अण्णासाहेब मगर स्टेडिमयसमोर, नेहरूनगर, पिंपरी) येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

Back to top button