Suicide : नाशिकमध्ये घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या | पुढारी

Suicide : नाशिकमध्ये घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या

नाशिक : टाकळी गाव परिसरात राहणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण माणिक पुराणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे पूर्व विभागात कार्यरत होते. घंटागाडी पर्यवेक्षक व ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून किरण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड हे चौकशी करीत असून त्यानंतर किरण यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा :

Back to top button