नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक | पुढारी

नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये 86.69 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. नीरजने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रॅनडाचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स यांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

नुकताच नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणार्‍या चोप्राने 86.69 मीटर फेक करून दमदार सुरुवात केली, जी तिच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी पुरेशी होती. वॉलकॉटने 86.64 मीटर थ्रोसह रौप्य आणि पीटर्सने 84.75 मीटर थ्रोसह कांस्यपदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही दुसरीच स्पर्धा आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या आठवड्याच्या सुरुवातीला, त्याने पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकले आणि त्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज आता 30 जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लीगमध्ये भाग घेणार आहे.

Back to top button