आरपीएफच्या जवानांकडून 5 महिन्यांत 20 प्रवाशांना जीवदान | पुढारी

आरपीएफच्या जवानांकडून 5 महिन्यांत 20 प्रवाशांना जीवदान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकल, मेल-एक्सप्रेसने प्रवास करीत असताना बर्‍यांचदा घाईघाईत गाडी पकडताना- चढताना प्रवाशांचा तोल जातो. ते रेल्वे रुळांवर पडतात. जानेवारी ते मे या पाच महिन्यात पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी 20 प्रवाशांना जीवदान दिले आहे.

रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) असते. प्रवाशांचा उपनगरीय लोकल आणि लांब पल्याचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी आरपीएफतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात रात्रं-दिवस आरपीएफचे जवान कार्यरत असतात.

पश्चिम रेल्वेवर मुंबई विभागात आरपीएफने 14 प्रवाशांचा जीव वाचविला आहे. त्यानंतर वडोदरा 3, रतलाम आणि राजकोट विभागात प्रत्येक एक-एक प्रवाशाला जीवदान दिले 2021 मध्ये आरपीएफने 34 प्रवाशांचे प्राण वाचविले होते. कुटुंबाचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केले आहे.

Back to top button