नाशिक : चिमुकलीवर अत्याचार करणार्‍यास दहा वर्षे सक्तमजुरी | पुढारी

नाशिक : चिमुकलीवर अत्याचार करणार्‍यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चिमुकलीवर अत्याचार करीत तिला जीवे मारण्याची धमकी देणार्‍यास जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रवींद्र चौहलसिंग बहोत (36, रा. देवळाली गाव) असे या आरोपीचे नाव आहे.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 3 च्या सुमारास देवळाली गावातील बकालवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षीय चिमुकली शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपी रवींद्र बहोतने पीडितेचे तोंड दाबून व हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रवींद्र बहोतविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कार, पोक्सो, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात 10 साक्षीदार तपासले. त्यात रवींद्र विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपी रवींद्रला 10 वर्षे सक्तमजुरी व 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा :

Back to top button