बोरी : तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादन वाढवा | पुढारी

बोरी : तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादन वाढवा

बोरी : पुढारी वृत्तसेवा; शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. शिरोडा भाजप किसान मोर्चातर्फे श्री गणनाथ देवस्थान सभागृह निरंकाल येथे कृषी संमेलनात झाले. यावेळी ते बोलत होते.

अखिल गोवा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, शिरोडा जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बेतोडाचे सरपंच विशांत गावकर, पंचवाडीचे सरपंच अमीर नाईक, फोंडा विभागाचे कृषी अधिकारी नितीन बोरकर, कृषी अधिकारी नागेश कोमरपंत, भाजप मंडळ अध्यक्ष सुरज नाईक, सचिव अवधुत नाईक, शिरोडा किसान मोर्चा अध्यक्ष बाबाजी नाईक आदी उपस्थित होते.

शिरोडा मतदार संघातील प्रगतशील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना कावथे, आंब्याची कलमे, भाजीचे बियाणे, मिरची व झेंडूची रोपे देण्यात आली. अ‍ॅड. सावईकर, गावकर, कोमरपंत, बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button