बेळगाव : सीईटीला 1472 विद्यार्थ्यांची दांडी | पुढारी

बेळगाव : सीईटीला 1472 विद्यार्थ्यांची दांडी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा सीईटीला पहिल्या दिवशी 1472 विद्याथ्यार्र्ंनी दांडी मारली. गुरूवारी जीवशास्त्र विषयाचा पेपर झाला. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात मिळून 11 हजार 784 विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला आहे. शहरात 15 परीक्षा केंद्रांवर गुरुवारपासून सीईटीला प्रारंभ झाला आहे. दिवशी सकाळी 10.30 ते 11.50 या वेळेत जीवशास्त्राचा पहिला पेपर झाला. या पेपरला 6141पैकी 5014 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पहिल्या पेपरला 1127 विद्याथ्यार्र्ंनी दांडी मारली.

दुपारच्या दुसर्‍या पेपरला 6141 पैकी 5796 विद्याथ्यार्र्ंनी परीक्षा दिली. या पेपरला 345 विद्यार्थी गैरहजर राहिले. जीवशास्त्र विषयाच्या दोन्ही पेपरला मिळून 1472 विद्यार्थी गैरहजर राहिले. शहरात 15 परीक्षा केंद्रांवर 254 वर्गात परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. चिकोडीत 237 वर्गखोल्यात सीईटीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी गणित विषयाचा पेपर असून हे पेपर देखील सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात घेण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या आवारात 200 मीटरपयर्र्ंत 144 कलम लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या भागातील झेरॉक्स, डीटीपी सेंटर, बुकस्टॉल बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागली.

Back to top button