नाशिक : ‘एनडीएसटी’ सोसायटीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; १७ जुलै ला मतदान | पुढारी

नाशिक : 'एनडीएसटी' सोसायटीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; १७ जुलै ला मतदान

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे दोन वर्षे पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर यांची अर्थवाहिनी असलेली एनडीएसटी सोसायटीचा निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला आहे. सोसायटीची २१ जागांसाठी निवडणुक दि. १७ जुलै रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी १ महिना बाकी असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी ला सुरवात केली आहे.

एनडीएसटी सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

दिनांक १४ जुन ते दिनांक २० जुन पर्यत – नामनिर्देशन पत्रे दाखल करणे
दिनांक २१ जुन रोजी -नामनिर्देशन पत्रे छाननी करण्यात येणार आहे.
दिनांक २२ जुन रोजी वैध नामनिर्देशन पत्रे प्रसिद्ध करण्यात येईल.
दिनांक २२ जुन ते दिनांक ०६ जुलै पर्यत नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यासाठी मुदत आहे.
दिनांक ०७ जुलै रोजी उमेदवार यांना निशाणी वाटप करण्यात येणार आहे.

तर रविवार दिनांक १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. दिनांक १८ जुलै रोजी
मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे एनडीएसटी सोसायटीला दोन वर्षे मुदत वाढ मिळाली होती. सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारीसह तीन पॅनल निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी १ महिना इतकाच कालावधी मिळणार असल्याने इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत.

हेही वाचा :

Back to top button