नॅशनल हेराल्ड प्रकरण : राहुल गांधी चौकशीसाठी आज पुन्हा ED कार्यालयात दाखल | पुढारी

नॅशनल हेराल्ड प्रकरण : राहुल गांधी चौकशीसाठी आज पुन्हा ED कार्यालयात दाखल

पुढारी ऑनलाईन : आज सलग दुसऱ्या दिवशी काॅंग्रेस नेते राहुल गांधी चौकशीसाठी ED कार्यालयात पोहचले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. काल दिवसभरात सुमारे साडेआठ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.

राहुल यांची ED कडून सकाळच्या पहिल्या फेरीत तीन तास चौकशी झाली. त्यानंतर राहुल सोनिया गांधींना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले त्यानंतर येथून ते पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहोचले. या दुसऱ्या फेरीत राहुल यांची सुमारे साडेपाच तास चौकशी झाली. आज पुन्हा राहुल यांना ED ने चौकशीसाठी बोलावले असल्याने ते ED कार्यालयात दाखल झाले आहेत.

काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

नॅशनल हेराल्ड प्रकरणी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीच्या चौकशीचा निषेध करणारे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि इतरांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र सिंग हुडा, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी आणि इतर काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात स्थळी नेले जात आहे.

हेही वाचा :

 

Back to top button