नाशिक : तंबाखू न दिल्याचा राग आल्याने एकास मारहाण | पुढारी

नाशिक : तंबाखू न दिल्याचा राग आल्याने एकास मारहाण

नाशिक (पंचवटी) : तंबाखू न दिल्याची कुरापत काढून तिघांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिराजवळ घडली. यात फुलदेव बादशाह शाह (३०, रा. नवनाथ नगर, पेठरोड) हा जखमी झाला आहे. फुलदेव याच्या फिर्यादीनुसार संशयित बॉबी मच्छिंद्र बाबर (रा. गौंडवाडी, फुलेनगर) याच्यासह इतर इतर दोन संशयितांना तंबाखू दिली नाही याचा राग आल्याने तिघांनी मिळून रविवारी (दि.५) रात्री साडे दहाच्या सुमारास मारहाण केली. बॉबी याने दगडही मारला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button