काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी | पुढारी

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजप पाठोपाठ आता काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अतुल लोंढे, सचिन सावंत यांची नावे चर्चेत होती. पण पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी बुधवारी (दि.८) दिली.

२० जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेचे सदस्य १० जागांसाठी मतदान करतील. महाविकास आघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, तर भाजपचे १०६ सदस्य आहेत. इतर पक्षांकडे १६ आमदार आणि १३ अपक्ष आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी २७ मतांची गरज आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने याधी आपले उमेदवार जाहीर केले. या यादीतून पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  यांचा पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.

Back to top button