नाशिक : नाशिक, पूना क्लब, परभणी संघ विजयी | पुढारी

नाशिक : नाशिक, पूना क्लब, परभणी संघ विजयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील विविध मैदानांवर सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 16 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात यजमान नाशिकसह पूना क्लब व परभणी विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. यजमान नाशिकने सातार्‍याचा एक डाव व 23 धावांनी धुव्वा उडविला.

प्रथम फलंदाजी करताना नाशिक संघाने पहिल्या डावात सर्व बाद 277 धावा केल्या. नाशिककडून साई राठोडने 87, वेद सोनवणेने 62, सिद्धार्थ काकडने 51 तर हुजैफ शेखने 36 धावांची खेळी केली. सातार्‍याकडून सुमेर जमादार, निरंजन भोसले, यशराज मदने, ओंकार गायकवाड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर सातार्‍याचा पहिला डाव सर्व बाद 122 धावांवर आटोपला. नाशिककडून हुजैफ शेख व साहिल पारख प्रत्येकी 3 बळी घेतले. दरम्यान, महात्मानगर क्रिकेट मैदानावर पूना क्लबविरुद्ध जालना असा सामना रंगला. पूना क्लबने 1 डाव व 36 धावांनी विजय मिळविला. परभणीविरुद्ध स्टार पुणे हा सामना खेळविण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button