औंध: आयटी पार्कमधील हॉटेलला आग | पुढारी

औंध: आयटी पार्कमधील हॉटेलला आग

पुणे : पुढारी वृत्तसेवा

औंध आयटीपार्क येथील इमारतीच्या टेरेसवर असणाऱ्या हॉटेलला बुधवारी पहाटे आग लागून हॉटेल मधील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे एक ते दीड तासात विझवली.

औंध येथील सानेवाडीमधे गायकवाड आयटी पार्क आहे. याच आयटी पार्कच्या टेरेसवर एक हॉटेल चालते. बुधवारी पहाटे पावणे सहाला अग्निशमन दलाला या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. येथील आग बऱ्यापैकी हॉटेल मध्ये पसरली होती. अग्निशन दलाच्या जवानांनी येथील फायर सिस्टीमचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र इमारतीची अग्निशमन यंत्रणा काम करत नसल्याचे आढळले.

जवानांनी लागलीच पाण्याचा मारा सुरू केला. एक तासाच्या परिश्रमानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली. पुढील काही मिनिटात आग संपूर्ण विझविण्यात आली. अग्निशमन दलाची पाच वाहने आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन अधिकारी राजेश जगताप आणि शिवाजी मेमाणे यांच्या जवानांनी ही आग विझवली.

Back to top button