धुळे : घरफोडी करणारी अल्पवयीन टोळी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

धुळे : घरफोडी करणारी अल्पवयीन टोळी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर शहर परिसरात घरफोड्या करणारी अल्पवयीन मुलांची टोळी पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतली असून टोळीचा म्होरक्या मात्र फरार झाला आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळीतील आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देत गुन्ह्यातील रोकड, मोबाईल फोन, देशी दारु आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महेश मदन भावसार (रा. भावसार गल्ली, पिंपळनेर) यांचे सेवा मोबाईलचे दुकान आहे. दि.२९ मे रोजी रात्री  चोरट्यांनी दुकानाची खिड़की तोडून दुकानातील ८ मोबाईल आणि इतर साहित्य असा ६९ हजार ५१८ रुपयांचा मुद्देमाल अल्पवयीन मुलांच्या टोळीने चोरला. याबाबत पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शहरातील सटाणा रोडवरील विजयानंद परमिट रूम देशी दारूच्या दुकानात दि.४ जून रोजी रात्री चोरी झाली. यावेळी दुकानाच्या मागील बाजूस असलेला लोखंडी प्रवेशव्दार तोडून चोरट्यांनी २४ हजार २९० रुपये किंमतीचे मद्य चोरून नेले. याबाबत पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेऊन घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पिंपळनेर पोलिसांना दिल्या. त्या अनुषंगाने पथकाने तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा:

Back to top button