जळगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खासदारांसमोर आक्रोश; खा. रक्षा खडसेंकडून पाहणी | पुढारी

जळगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खासदारांसमोर आक्रोश; खा. रक्षा खडसेंकडून पाहणी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
यावल तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (दि.३)  रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी, तहसीलदार यांनी यावल तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली.
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा, मोहराळा, चुंचाळे, बोराळे, चिंचोलीसह विविध ठिकाणी व परिसरात ३१ मे रोजी मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा फटका बसला आहे. जोरदार पावसासह वादळीवा-यामुळे पिकांचे मुख्यत: कापणीवर आलेल्या केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हिंगोणा शिवार व तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसाग्रस्त केळी बागांना खा. खडसे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी रक्षा खडसे यांच्या सोबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण  चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फ़ेगडे, जिल्हा चिटणीस सविता भालेराव, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सागर महाजन, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फ़ेगडे, मनोज वायकोळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील, तहसीलदार महेश पवार, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांच्यासह विविध विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी तसेच हिंगोणा तलाठी धांडे, शेतकरी परेश राजपूत, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, फ़िरोज तडवी, मछिंद्र पाटील, किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
मदतीचे आश्वासन
शेतकऱ्यांनी खा. रक्षा खडसे यांच्यासमोर पिकांचे विदारक परिस्थितीचे कथन केले. शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना रक्षा खडसे यांनी व लोकप्रतिनिधींनी धीर दिला. तसेच त्वरीत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा:

Back to top button