राहात्यात विखेच मारणार बाजी..? | पुढारी

राहात्यात विखेच मारणार बाजी..?

शिर्डी :

अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रारूप आराखडा प्रसारित करण्यात आला. राहाता तालुक्यात एका गट आणि दोन गणांची वाढ झाल्यामुळे राजकीय गटामध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण संचारले आहे. राहाता तालुक्यात पूर्वी पुणतांबा, साकुरी, लोणी, कोल्हार, आणि वाकडी असे मिळून पाच गट होते. या गटा दरम्यान राहाता पंचायत समितीचे 10 गण होते.

त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काही भाग आलेला होता. राहाता विधान सभा मतदार संघातील काही भाग हा संगमनेर विधान सभेत गेला होता. विधानसभेप्रमाणे प्रारूप आराखडा तसाच राहिला असला तरी यंदा एका गटाची व दोन गणांची वाढ झाली आहे. तालुक्यावर आजपर्यत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची पकड मजबूत असून, त्यांचेच स्पष्ट बहुमत होते. या बदलाचा त्यांच्या उमेदवारांवर परिणाम होईल की नाही, पाहणे औत्सुक्याचे आहे, मात्र नवीन गट वाढल्याने विखे विरोधकही चांगलीच कंबर कसून तयारी लागल्याची आशा निर्माण झाली आहे…

पिंपरी-चिंवचड पाण्याचा प्रश्न मिटणार: दहा दिवसांत मिळणार 100 एमएलडी अतिरिक्त पाणी; प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

तालुक्यातील पुणतांबा हा गट सध्या कोपरगाव विधान मतदार संघात येतो. या भागात आ. आशुतोष काळे यांचे वर्चस्व असले तरी या गटातील रामपूर, चितळी, रांजणगाव, एकरखे ही गावे ही वाकडी गटात गेली आहे, मात्र वाढ झालेली नाही. या गटावर विखे गटाचे वर्चस्व आहे. वाकडी गटात साकुरी गटातील अस्तगाव हे मोठं पॉकेट आलेले आहे. तर याच गटातील बाभळेश्वर, राजुरी, नांदूर ही गाव बाभळेश्वर गटात गेली आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य यांनी केलेली पेरणी किंवा आलेल्या गावाची रसद मिळण्याची शक्यता आहे.

साकुरी गटातून अस्तगाव हे मोठे पॉकेट कमी झाले आहे.त्याच बरोबर केलवड खु., खडकेवाके, हा भाग लोणी बाभळेश्वर मध्ये गेला आहे, मात्र या गटात वाढ झालेली आढळली नाही. लोणी गट जि.प.च्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांचे वर्चस्व असणारा गट आहे. या गटातील पिंपरी निर्मळ, पिंपरी लौकई, आडगाव खु आणि बु , गोगलगाव, हे दुसर्‍या गटात जोडले आहेत, मात्र या गटात वाढ झालेली नाही. या गटात लोणीखु॥ व लोणी बु॥ , हसनापूर, चंद्रापूर , लोहगाव अशी गावे आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात ‘कहीं खुशी, कहीं गम’

कोल्हार गट एकमेव असा आहे की, गटात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे याची रचना आहे तशीच आहे. या गटात तिसगाव, कोल्हार, ममदापूर, दाढ बु॥, भगवतीपुर, पाथरे, हनुमंतगाव अशी गाव आहेत. त्याचप्रमाणे यंदा बाभळेश्वर हा गट नव्याने तयार करण्यात आला आहे. या गटात वाकडी गटातील बाभळेश्वर, राजुरी, नांदूर बु, रांजणखोल, तर लोणी गटातील पिंपरी निर्मळ, गोगलगाव, आडगाव खु॥, आडगाव बु॥, केलवड बु ही गावे मिळून हा गट तयार करण्यात आला आहे.

जिल्हापरिषदेचे गट 6 आणि 10 गण झाले आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी मधून आ. आशुतोष काळे तर काही गटातून रावसाहेब म्हस्के, एकनाथ घोगरे यांनी तर काँग्रेस मधून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची लढत झाली होती. या लढतीमध्ये विखे सर्वच गट आणि गणाच्या जागा जिंकल्या होत्या, मात्र आता राज्यात मविआ सत्तेत आले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्ष जोर लावतील.

राष्ट्रवादीकडून साई संस्थानचे अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे यांची निवड झाली आहे. रावसाहेब म्हस्के यांना नवीन गट मिळाल्याने ते निवडणुकीत येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आ. राधाकृष्ण विखे हे भाजपात गेल्यामुळे पुन्हा विखे आणि विरोधक असे गणित स्थानिक निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. विखे गटाची एकहाती सत्ता ठेवण्यासाठी ते ही प्रयत्नशील राहणार आहे.

Back to top button