पुणे जिल्ह्यात 700 ई-सेवा केंद्रे वाढणार | पुढारी

पुणे जिल्ह्यात 700 ई-सेवा केंद्रे वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ई-सेवा केंद्रांतून नागरिकांना विविध प्रकारच्या 42 दाखल्यांसह अन्य सेवा दिल्या जातात. पुणे शहर आणि ग्रामीण भागात सध्या 1 हजार 433 केंद्रे कार्यन्वित आहेत. नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी अजून 700 केंद्रांची भर पडणार आहे. त्याची निवड प्रक्रिया सुरू असून, जुलैअखेर ही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू

ई-सेवा केंद्रांमध्ये रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, नवीन रेशन कार्ड, दुबार आणि सातबारा उतारा यासह अन्य दाखले काढून दिले जातात. प्रत्येक दाखला काढण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारणी, दहा रुपयांचे कोर्ट फी स्टँप आणि तीन रुपये सेवाकर अशी एकूण 33 रुपये रक्कम निश्चित करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत विविध अभ्यासक्रमांचे निकाल घोषित होणार असून, विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी दाखल्याची आवश्यकता असते. दाखले मिळविण्यासाठी पालक, विद्यार्थ्यी केंद्रांवर एकाच वेळी गर्दी करतात.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात एकूण 1 हजार 433 ई-सेवा केंद्रे सुरू आहेत. त्यातून दाखले दिले जात आहेत. जिल्ह्यातील नवीन 700 ई-सेवा केंद्रांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत असून, जुलै अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात 2100 पेक्षा केंद्रे कार्यान्वित होतील. यामुळे नागरिकांना दाखले वेळेत मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

जिल्ह्यातील प्रत्येकाला आवश्यक दाखले वेळेत व योग्य दरात मिळाले पाहिजेत; तसेच येत्या काळात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला आवश्यक असतो. त्यामुळे निकाल लागल्यानंतर एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी तत्काळ दाखले काढून घ्यावेत. कोणताही ई-केंद्रधारक निश्चित दरापेक्षा अधिक पैसे घेत असल्यास तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

                                  – हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.

 

Back to top button