Nashik : गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास विठेवाडीत विरोध | पुढारी

Nashik : गिरणा नदीपात्रातील वाळू लिलावास विठेवाडीत विरोध

नाशिक (देवळा) पुढारी वृत्तसेवा :

गिरणा नदी पात्रातील वाळू लिलावाबाबत विठेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा (दि. २) रोजी उपविभागीय अधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गिरणा नदी पात्रातून विठेवाडी गांव व वसाका कार्यस्थळावरील अवैद्य वाळू तस्करी संदर्भात प्रखर विरोध करत कुठल्याही परिस्थितीत वाळूचा निलाव होऊ दिला जाणार नाही असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

या विशेष ग्रामसभेत प्रांत अधिकारी देशमुख यांनी शासनाची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव निकम यांनी गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याने त्याला शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप केला. राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असताना महसूल विभाग हा वराती मागे घोडं नाचवत आहे. विशेष ग्रामसभेत वाळू उपसा संदर्भात प्रस्तावित टेंडर प्रक्रियेला एकमुखी विरोध दर्शविला व तसा ठराव मंजूर करण्यात आला.  पी. डी. निकम यांच्या ठरावाला कुबेर जाधव यांनी अनुमोदन दिले.

याप्रसंगी गावातील शेकडो तरुण व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. ग्रामसभेस विलास निकम, पंडितराव निकम, शशी निकम, तानाजी निकम, दीपक निकम, बाळासाहेब सोनवणे, धना निकम, काकाजी निकम, राजु निकम, पपु निकम, प्रविण निकम, ग्रामसेवक सोनवणे, मंडल अधिकारी राम परदेशी, तलाठी नितीन धोंडगे, जिभाउ गरुड आदीसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button