विक्री कर उपायुक्त नागेश जाधव अधिकारी घेणार निमगाव डाकू दत्तक

कर्जत : विक्री कर उपायुक्त नागेश जाधव यांचा सत्कार निमगाव ग्रामस्थ.
कर्जत : विक्री कर उपायुक्त नागेश जाधव यांचा सत्कार निमगाव ग्रामस्थ.
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा 

सेवानिवृत्त अधिकार्‍यांने निवृत्तीनंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाव दत्तक घेण्याच जाहीर केले. उर्वरित आयुष्य समाजासाठी खर्च करणार असल्याचे विक्रीकर उपायुक्त नागेश जाधव यांनी सांगितले. तालुक्यातील निमगाव डाकू गावचे सुपुत्र व राज्याचे विक्री कर विभागाचे उपायुक्त नागेश जाधव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला.

त्यांची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. गावाचा सुपुत्र राज्याची मोठी जबाबदारी पार पाडून पुन्हा आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू न देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान निमगावकरांनी केला. अध्यक्षस्थानी मधुकर राळेभात होते.

यावेळी कैलास शेवाळे, प्रवीण घुले, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, जिल्हा उपनिबंधक सुनील कोठावळे, रवी गायकवाड पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, युवराज गिरी,सुरेश शिंदे, सचिन शेंडकर, बाळासाहेब धस, दादा फाळके उपस्थित होते. जाधव म्हणाले की, निमगाव डाकू येथील गरीब कुटुंबात जन्म झाला. शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. परंतु मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न होते. अनेकांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी मिळाली.

नोकरी करताना सामजिक वसा घेतला तो सोडला नाही. अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत केली, अनाथ शाळेला मदत केली. हाच सामाजिक वारसा पुढे सुरू ठेवणार असून, आपल्या जीवनातील उर्वरित आयुष्य हे आपण समाजासाठीच व्यतीत करणार आहे. कमिशनर रवी गायकवाड म्हणाले, नागेश जाधव यांच्याबरोबर काम केले. परंतु कोणत्याही संकटात खर्‍या अर्थाने एक मित्र म्हणून प्रत्येकाला मदत करणारे अशीच त्यांची ओळख आहे.

यावेळी जिल्हा उपनिबंधक सुनील कोठावळे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मधुकर राळेभात, प्रवीण घुले, कैलास शिवाळे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, दादा फाळके, संतोष राजेभोसले यांनी जाधव यांच्या सामाजिक कार्याच तोंड भरूने कौतुक केले.
जि. प. सदस्य संतोष वारे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news