ई-वाहनांमध्ये बदल करताय? सावधान; ‘आरटीओ’कडून कारवाईचा वेग वाढला | पुढारी

ई-वाहनांमध्ये बदल करताय? सावधान; ‘आरटीओ’कडून कारवाईचा वेग वाढला

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बॅटरी क्षमता 250 वॅट असलेल्या ई-बाईकमध्ये परस्पर बदल करणार्‍यांवर परिवहन विभागाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 हजार 253 वाहनांची तपासणी केली आहे. यात 347 ई-बाईक दोषी आढळल्या असून, त्यातील 233 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

परिवहन विभागाने अनधिकृतरीत्या बदल करणार्‍या ई-वाहनांवर कारवाईचे आदेश 19 मे रोजी दिले. 31 मेपर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांनी ही कारवाई केली आहे. यात राज्यातील 131 ई-बाईकच्या शोरूमची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर संबंधित शोरूम चालकांना याबाबत लेखी खुलासा मागितला आहे.

Harini Logan : भारतीय वंशाच्या हरिणी लोगननं इतिहास रचला, ठरली स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेची विजेती

पुणे आरटीओची कारवाई

23 शोरूम तपासले
51 ई-बाईकची तपासणी
15 ई-बाईक सदोष
12 ई-बाईक जप्त

ई-बाईकमध्ये परस्पर अंतर्गत बदल करून वेग मर्यादा वाढवू नका अथवा जादा क्षमता असलेली बॅटरी बसवू नका. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

e

 

Back to top button