धुळे : निजामपूरला पाच जणांवर दंगलीचा गुन्हा  | पुढारी

धुळे : निजामपूरला पाच जणांवर दंगलीचा गुन्हा 

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील निजामपूर शिवारातील रोजगाव येथे शेतात कापूस बियाणांची लागवड करीत असताना संगनमताने शेतात ट्रॅक्टर घूसवून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना पंढरीनाथ सूर्यवंशी-माळी (रा.रोजगाव, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार सकाळी ८ च्या सुमारास दिलीप सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, मुकेश सूर्यवंशी व राहुल सूर्यवंशी (रा.रोजगाव, ता. साक्री) यांनी फिर्यादी यांच्या शेतात संगनमताने ट्रॅक्टर घूसवून बांधणी केलेल्या शेताचे नुकसान केले. तसेच फिर्यादीचे पती पंढरीनाथ, राज व विशाल या दोन्ही मुलांना शिवीगाळ करीत मारहाण केली.  संशयितांविरूध्द निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button