नाशिक : घरात शिरून महिलेचा विनयभंग, शिवीगाळ करीत केली जबरदस्ती
नाशिक : घरात शिरून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयिताने शनिवारी (दि.28) सायंकाळी मद्यसेवन करून महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ केली. त्याने महिलेचा विनयभंग करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.