नगर: पाथर्डीचे सराईत गुन्हेगार जळगावात गजाआड; आयजीच्या पथकाची कारवाई | पुढारी

नगर: पाथर्डीचे सराईत गुन्हेगार जळगावात गजाआड; आयजीच्या पथकाची कारवाई

नगर : पुढारी वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाथर्डी तालुक्यातील टोळीला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने पकडून गजाआड केले. गणेश बाबासाहेब केदारे, विकास अप्पासाहेब गिरी (दोघे रा. पाडळी, ता. पाथर्डी), कालिदास दत्तात्रेय टकले(रा. हत्रळ, ता. पाथर्डी) अशी अटक केेलेल्या आरोपींची नावे आहेत, तर उमर्टी मध्यप्रदेशातील दोन आरोपी पसार झाले.

डिजिटल इंडियात ‘शिक्षण व्यवस्था’ असाक्षर : साडेतीन हजार शाळांचा जमाखर्च ‘कागदावरच’

गावठी कट्टाजवळ बाळगून काही लोक दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार चोपडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि आयजीच्या पथकातील कर्मचार्‍यांनी सापळा लावून वरील आरोपींना मोटारकारसह पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे, 14 जिवंत काडतूस, एक वस्तरा व स्कॉर्पिओ मोटारकार असा 6 लाख 43 हजार 100 असा मुद्देमाल जप्त केला.

अर्थज्ञान : ‘सुंदरम् सर्व्हिसेस फंड’ ऑल टाईम विनर!

वरील आरोपींना चोपडा पोलिस ठाण्यात हजर करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक फौजदार बशित तडवी, पोलिस कर्मचारी रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहारे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

नेवासा: गोदावरी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

पुणे: महापालिकेचा मिळकतकर सवलत फक्त उद्यापर्यंतच; 1 जूनपासून 2 टक्के दंड होणार लागू

प्रवेशद्वारावरूनच वाहतूक कोंडीतून पुणे दर्शन; शनिवारवाडा लगत पे अ‍ॅन्ड पार्कची गरज!

Back to top button