बार्शी (साेलापूर ) : पुढारी वृत्तसेवा : कामावर जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून एका परप्रांतीयाने आपल्या सहकारी महिलेचा राहत्या घरीच ओढणीने गळा आवळून खून केला. हा प्रकार बार्शीतील पंकजनगर भागात घडला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला आहे.
मुस्लिमा लुथफार सरदार (वय 35, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बागबुल ऊर्फ शाकिर हुसैन शेख (वय 38, रा. कलबंगा, ता. नाक्षिपारा, जि. नाडिया पश्चिम बंगाल) असे खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीयांचे नाव आहे.
मृत महिलेस महाबूर (12) व आसिक (10) अशी दोन मुले आहेत. मुस्लिमा ही मूळची पश्चिम बंगाल राज्यातील असून कामाच्या निमित्ताने ती महाराष्ट्रात आली होती. बागबुल उर्फ शाकिर हुसैन शेख हा पश्चिम बंगाल येथील असून या महिलेसोबत 3 वर्षांपासून राहत होता.
बागबूल याने सकाळी मयत महिलेस कामावर जाऊ नकोस, असे म्हणून भांडण केले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास बागबुलने मयत महिलेच्या दोन्ही मुलास बाहेर जाऊन खेळण्यास सांगितलेे. थोड्यावेळाने दोन्ही मुले खेळून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा समोरील दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो उघडला नाही. आसिक हा पाठीमागील दरवाजाकडे गेला असता आई किचनमध्ये खाली पडलेली दिसली व तिच्या गळ्याभोवती ओढणी असल्याचे दिसले. दोघा भावांनी घरमालक मिरगणे यांना फोन करून सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले. महिलेस रूग्णालयात नेले असता तिला मयत घोषित करण्यात आले.
फरार बागबूल याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल पवार करीत आहेत.
हुसैन शेख हा पश्चिम बंगाल येथील असून या महिलेसोबत 3 वर्षांपासून राहत होता. बागबूल याने सकाळी मयत महिलेस कामावर जाऊ नकोस, असे म्हणून भांडण केले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास बागबुलने मयत महिलेच्या दोन्ही मुलास बाहेर जाऊन खेळण्यास सांगितलेे. थोड्यावेळाने दोन्ही मुले खेळून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा समोरील दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो उघडला नाही. आसिक हा पाठीमागील दरवाजाकडे गेला असता आई किचनमध्ये खाली पडलेली दिसली व तिच्या गळ्याभोवती ओढणी असल्याचे दिसले. दोघा भावांनी घरमालक मिरगणे यांना फोन करून सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले. महिलेस रूग्णालयात नेले असता तिला मयत घोषित करण्यात आले.
फरार बागबूल याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल पवार करीत आहेत.