नाशिक : पिस्तुलाची तस्करी करणार्‍या तरुणास बेड्या | पुढारी

नाशिक : पिस्तुलाची तस्करी करणार्‍या तरुणास बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावरुन पिस्तुलाची तस्करी करणार्‍या तरुणास नरडाणा पोलिस ठाण्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून चार पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. हरीयाणा राज्यातील हा तरुण असून त्याने पूर्वी देखिल या भागात पिस्तुलाची विक्री केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

हरीयाणा राज्यातील दोघे युवक महाराष्ट्रात अवैध तस्करीच्या हेतूने दाखल झाल्याची माहीती नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज ठाकरे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर तसेच दभाशी गाव शिवारात सापळा रचला. यावेळी तब्बल पाच तास परीश्रमांनतरही संशयीत दिसून आढळून न आल्याने त्यांनी माहीतीची खातरजमा केली. त्यानंतर बस स्थानकाजवळ  दोन युवक संशयीतपणे उभे असल्याचे दिसुन आले. यातील एक जणाकडे हत्यारे असल्याचा संशय पथकाला आला. त्यामुळे साध्या वेशातील पोलिस पथकाने त्या तरुणाची चौकशी केली. मात्र, दुसर्‍या बाजुला असलेल्या युवकाने लगेचच घटनास्थळावरुन पलायन केले. पोलिस पथकाने शक्तीसिंग सुरेशकुमार या युवकाला ताब्यात घेवून त्याच्याजवळील सॅकची तपासणी केली असता त्यात गावठी बनावटीचे चार पिस्तुल आढळुन आले. तर पाच मॅगझिनसह पाच जिवंत काडतुस आढळले. पसार झालेल्या युवकाचे नाव कपिल जाट असून त्याचा शोध सुरू आहे. या दोघा तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button