Mamata Banerjee : ममतांचा दे धक्का! राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असणार विद्यापीठांचे कुलपती | पुढारी

Mamata Banerjee : ममतांचा दे धक्का! राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असणार विद्यापीठांचे कुलपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : प. बंगालमधील विद्यापीठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री कुलगुरू असतील, असा मोठा निर्णय राज्यातील ममता बॅनर्जी (mamata banerjee) सरकारने आज जाहीर केला. राज्य सरकार यावर एक दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडणार आहे. (Mamata Banerjee government to introduce bill to make Chief minister chancellor of state universities)

Athlete Murali Sreeshankar : भारतीय ॲथलीट मुरली श्रीशंकरची ग्रीसमधील जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण उडी’! (Video)

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्तीवरून रस्सीखेच सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी ममता सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. (Mamata Banerjee)

ज्ञानवापी खटला सुनावणीस याेग्‍य की अयाेग्‍य, यावर आता ३० मे राेजी सुनावणी

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी बैठकीनंतर सांगितले की, बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्यातील विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती होते. पण यापुढे मुख्यमंत्री कुलपती असतील असे त्यांनी सांगितले. (Mamata Banerjee)

 

Back to top button