देहू : स्मरणीय शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण | पुढारी

देहू : स्मरणीय शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा

श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांचे स्मरणीय शिळा मंदिर साकारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 14 जून रोजी होणार आहे. भूमिपूजनप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी असा हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा देहूच्या इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर महाराज कासावीस झाले आणि त्यांनी एका शिळेवर बसून तेरा दिवस अन्नत्याग केला. तेरा दिवसांनी गाथा वर आल्या. त्या शिळेचे मंदिर म्हणजे शिळा मंदिर होय.
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण ।
प्राण हा सांडीन तुजवरी ॥
या अभंगाच्या पंक्तीत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवल्यानंतर केलेला अन्याय त्यात विषद करण्यात आला आहे. ज्या शिळेवर महाराजांनी तेरा दिवसांचा उपवास केला, ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे. म्हणून या मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

संपूर्ण मंदिराचे पुर्निर्माण

मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती व मंदिरावर कळस नव्हता. आता संपूर्ण दगडांमध्ये मंदिराचे पुनर्निर्माण झाले असून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची अखंड काळया पाषाणाची 42 इंच मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिरावर 36 कळस स्थापन केले आहेत.

Online Gaming : भारतात ऑनलाइन गेमिंगवर येणार निर्बंध; केंद्र सरकारने केली समिती स्‍थापन

सन 2008 मध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म चतु:शताब्दी 400 व्या जयंतीनिमित्त तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व संकल्प करण्यात आला होता. सर्वोदय भारत शिल्पकला कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे शिवाजी गुट्टे यांचे सन 2015-16 रोजी टेंडर पास केले. बांधकामासाठी खर्च 1,17, 47, 500 रुपये एवढा आला. संपूर्ण मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे केले आहे. मूळ गर्भगृह 14 बाय 14 फूट असून आंतर गर्भगृह 9 बाय 9 फुटांचे आहे. मंदिराची उंची 17 .12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे.

नवज्योत सिंग सिद्धू कैदी नंबर २४१३८३, कारागृहात करणार क्लार्कचे काम

मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी

बांधकामासाठी खर्च 1,17, 47, 500 रुपये एवढा आला. संपूर्ण मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14 बाय 14 फूट असून आंतर गर्भगृह 9 बाय 9 फुटांचे आहे. मंदिराची उंची 17 .12 एवढी आहे. मंदिराची जमिनीपासून उंची 42 फूट आहे.

Back to top button