जळगावात धडक मोहीम; कॅरिबॅग्ज जप्त | पुढारी

जळगावात धडक मोहीम; कॅरिबॅग्ज जप्त

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्लास्टिकबंदीबाबत धडक कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. २३) अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सुभाष चौक, फुले मार्केटसह विविध भागांतील व्यावसायिकांकडून सिंगल यूज प्लास्टिक कॅरिबॅग्ज जप्त करून नष्ट केल्या आहेत.

शहरात प्लास्टिकबंदी नियमानुसार गेल्या आठवड्यापासून प्लास्टिक उत्पादकांवर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशानुसार, संबंधित विभागाने कारवाई करीत जवळपास ६ टन सिंगल यूज प्लास्टिक कॅरिबॅग्ज जप्त केल्या. तसेच शुक्रवारी (दि. २०) महापालिकेत आयुक्त डॉ. गायकवाड यांनी विविध व्यावसायिकांची बैठक घेऊन सिंगल यूज प्लास्टिक कॅरिबॅग्जचा वापर न करण्याचे आवाहन व्यावसायिकांसह नागरिकांना केले. त्यानुसार सुभाष चौक, फुले मार्केट परिसरासह इतर भागांत ही कारवाई राबविण्यात आली. व्यावसायिकांकडून पाच ते सहा किलो प्लास्टिक कॅरिबॅग्ज जप्त करण्यात आल्या. या कॅरिबॅग व्यावसायिकांसमोरच नष्ट करण्यात आल्या. नागरिकांनी प्लास्टिक कॅरिबॅग्जचा वापर बंद करावा, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे अधीक्षक इस्माईल खान यांनी केले आहे, तर आयुक्तांच्या निर्देशांनुसार, अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ठाकूर, किशोर सोनवणे, नाना कोळी, शेखर ठाकूर, साहेबराव शंकपाळ, दीपक कोळी, हिरामण बाविस्कर, भानू ठाकरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button