नाशिक : युवकाचा मोबाइल हिसकावत त्याच्या आईचा विनयभंग, जीवे मारण्याची दिली धमकी | पुढारी

नाशिक : युवकाचा मोबाइल हिसकावत त्याच्या आईचा विनयभंग, जीवे मारण्याची दिली धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कुरापत काढून दोघांनी मिळून युवकाकडील मोबाइल हिसकावला. यामुळे युवकाच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी महिलेचा विनयभंग करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात उज्वल कलंकार (रा. पाथर्डी फाटा) व कृष्णा मुंडे (रा. चेहेडी पंपिग) यांच्याविरोधात जबरी चोरी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी मंगळवारी (दि.१०) सायंकाळी मुंबईनाका परिसरात पीडितेकडे चेक व बाँड मागितला. संशयितांनी पीडितेच्या मुलास धक्काबुक्की करीत त्याच्याकडील सात हजार रुपयांचा मोबाइल हिसकावला. पीडितेचाही विनयभंग करीत पैसे लगेच ट्रान्सफर न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button