Nashik News | घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू | पुढारी

Nashik News | घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू झाल्याची घटना धामणकर कॉर्नर परिसरात घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. मखमलाबाद राेड) असे या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ( दि. १३ ) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी सातपुते या सकाळी दहाच्या सुमारास काकतकर हॉस्पिटलजवळील एका इमारतीबाहेर आल्या. तेथून पायी जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या घंटागाडीच्या मागील बाजूस ट्रॉलीवर तोल जाऊन त्या धडकल्या. त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णायालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी नलिनी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –

Back to top button