नाशिक : आजी-आजोबांच्या सतर्कतेमुळे बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला | पुढारी

नाशिक : आजी-आजोबांच्या सतर्कतेमुळे बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आजी-आजोबांच्या सतर्कतेमुळे चार वर्षिय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास शरणपूर रोडसारख्या गजबजलेलया परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरणपूर रस्त्यावरील बेतेल नगर परिसरातील मातृछाया या बंगल्यात सकाळी सात वाजता झोपेत होते. आजीबाई किचन रूममध्ये काम करत होते. तर आजोबा दूध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यांनी दरवाजाला कडी न लावता फक्त लोटून घेतला. हीच संधी साधत अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून हॉलमध्ये खेळणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेचा हात धरुन तिला घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. आजीचे लक्ष गेल्याने तिने आवाज दिल्यानंतर सदरचा इसम बालिकेला घेऊन पुढे चालत राहिला.

बंगल्याच्या आवारात असतानाच समोरून येणाऱ्या आजोबांनी आरोडाओरड करत संशयितामागे धावले. तसेच घरातील इतर बाहेर आल्याने अज्ञात इसमाने बालिकेला तिथेच सोडून पोबारा केला. सुदैवाने बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, नेमका अपहरणाचा प्रयत्न का व कुणी केला, याची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, परिसरातील प्रत्यक्षदर्शींसह इतर माध्यमातून तपास केला जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button