नाशिक : पत्नीच्या निधनानंतर दुसर्‍याच दिवशी पती अपघातात ठार | पुढारी

नाशिक : पत्नीच्या निधनानंतर दुसर्‍याच दिवशी पती अपघातात ठार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
पत्नीच्या निधनानंतर दुसर्‍याच दिवशी पतीचे अपघाती निधन झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल येथे सोमवारी (दि. 2) सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेश चिंधा अहिरे (40, आम—पालीनगर, कॅनॉलरोड, जेलरोड) असे मृताचे नाव आहे.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अहिरे हे आपल्या दुचाकी (एमएच 15 सीजी 5119) या दुचाकीवरून पत्नीचा फोटो तयार करण्यासाठी नाशिकरोड येथे गेले होते. तिथून कार्यक्रमाबाबत सांगण्यासाठी ते सिद्धार्थनगर येथे राहणार्‍या आपल्या बहिणीकडे जात असताना उपनगर सिग्नल येथे नाशिकच्या दिशेने जात असताना हरियाणा येथील ट्रकने (एचआर 69 सी 6737) अहिरे यांना धक्का दिला. त्यात ते चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित जीव वाचला असता, अशी घटनास्थळी होती. अहिरे यांना 13 आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. घटनास्थळी उपनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button