नाशिक : बस प्रवासात महिलेकडील दागिने लंपास | पुढारी

नाशिक : बस प्रवासात महिलेकडील दागिने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सुरत ते शिर्डी प्रवास करणाऱ्या महिलेकडील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुशीला गोरख कुंभार (रा. सुरत) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

सुशीला यांच्या फिर्यादीनुसार त्या रविवारी (दि.२४) बसमधून शिर्डीला जात होत्या. चोरट्याने सुरत ते नाशिकमधील द्वारका चौफुली दरम्यान सुशीला यांच्या पर्समधील ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button