नाशिक : पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम, हवामान खात्याचा अंदाज | पुढारी

नाशिक : पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम, हवामान खात्याचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या पार्‍यात सोमवारी (दि. 25) एका अंशाने वाढ होऊन तो 39.6 अंशांवर पोहोचला. वाढत्या पार्‍यासोबत उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील.

राज्यात मागील तीन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट पसरली आहे. नाशिकच्या पार्‍यात वाढ होऊन तो चाळिशीच्या नजीक येऊन ठेपला आहे. त्यामुळे तीव्र उकाडा जाणवत असून, सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे, तर उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, एसी, कूलरची मदत घेत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतीची कामे खोळंबून राहात आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

Back to top button