नाशिक : उष्णतेत होणार आणखी वाढ ; हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती | पुढारी

नाशिक : उष्णतेत होणार आणखी वाढ ; हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

नाशिक : शहर-परिसरात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (दि. 24) पारा 38.9 अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. उकाड्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सोमवार (दि. 25) पासून नाशिकसह राज्यात उष्णतेमध्ये अधिक वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

त्याचवेळी नाशिकमध्ये शनिवारी (दि. 23) पारा 40.2 अंशांवर स्थिरावला होता. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सर्वसामान्यांना घरात बसणे मुश्कील झाले. सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, एसी, कूलरची मदत घेत आहेत. तसेच अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी शीतपेये घेण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, शहरापेक्षा ग्रामीण भागातही यापेक्षा चित्र वेगळे नाही. उन्हाच्या तीव्रलहरींमुळे शेतीची कामे खोळंबत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसत आहे. येत्या काळात उन्हाचा कडाका अधिक वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button