Sangli : सांगलीत चाकूच्या धाकाने महिलेला लुटले | पुढारी

Sangli : सांगलीत चाकूच्या धाकाने महिलेला लुटले

सांगली : पुढारी वृत्तसेवा विश्रामबाग परिसरातील विठ्ठलनगरमध्ये घरात प्रवेश करून तिघा चोरट्यांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून 33 हजार रुपयांचे दागिने पळवले. याप्रकरणी छाया सीताराम शिपूर (वय 51, रा. मोहिते मळा) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, विठ्ठलनगरमधील मोहिते मळ्यात छाया शिपूर राहतात. त्या घरी एकट्याच असताना तिघे चोरटे मध्यरात्रीनंतर त्यांच्या घरासमोर आले. खिडकीतून काठीने दरवाजाची कडी काढली. हॉलमध्ये आल्यानंतर तेथून स्वयंपाकघरात प्रवेश केला. स्टीलच्या डब्यात ठेवलेली सोन्याची एक तोळ्याची बोरमाळ घेतली. त्यानंतर त्यांनी छाया यांना उठवले.

त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर चोरट्यानी टीव्हीवर ठेवलेला मोबाईल घेतला. छाया यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पलायन केले. या प्रकारामुळे छाया शिपूर घाबरल्या होत्या. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिघा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button