नाशिक : अखेरच्या दिवशी दीपक पांडेय यांचा पेट्रोलपंप चालकांना दिलासा | पुढारी

नाशिक : अखेरच्या दिवशी दीपक पांडेय यांचा पेट्रोलपंप चालकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरातील तीन पेट्रोल पंप चालकांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र अखेरच्या दिवशी त्यांनी या नोटीस मागे घेतल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांना दिलासा मिळाला आहे.

नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पपंचालकाना नोटीस बजावण्यात येत होती. त्यानुसार पोलीस आयुक्त पांडेय यांनी शहरातील पालिजा पेट्रोलियम, खालसा पेट्रोलियम व एन एल गांधी पेट्रोलियम यांना परवाना रद्द करण्याचे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामुळे पेट्रोल पंप संघटना व पोलिसात वाद उफाळला होता. त्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या पिटीशनचा दाखला देत या नोटीस मागे घेण्याची पोलीस आयुक्तांना विनंती केली होती. त्यानुसार पांडेय यांनी नोटीस मागे घेत संबंधित पेट्रोल पपंचालकाना लेखी कळवले आहे.

Back to top button